उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर किरण सामंत यांना राजापूर मधून उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 45 जणांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. रत्नागिरी मधून उदय सामंत यांना तर राजापूर मधून किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उदय सामंत हे मागील चार टर्म आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून येत आहेत. प्रत्येकवेळी त्यांचे मताधिक्य हे वाढत जाणारे आहे. प्रचंड विकासकामांच्या जोरावर ते आपला गड मजबूत करण्यात यशस्वी देखील झाले आहेत. आपल्याला मिळालेला प्रत्येक मंत्रिपदाचा फायदा त्यांनी रत्नागिरीला करुन देण्यात भर दिला आहे. किरण सामंत रत्नागिरीच्या राजकारणात आजवर किंग मेकर म्हणून ओळखले जात होते. आज ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जनतेच्या अडचणी सोडवत बहुतांशी मतदारसंघातील जनतेला आपल्याकडे वळवण्यात किरण सामंत यांना मोठे यश मिळाल्याचे दिसत आहे.
या दोन्ही जागा प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास जनतेमधून व्यक्त करण्यात येतोय.