Devrukh: दिव्यांग प्रमाणपत्रासाठी देवरुखात आज शिबिर

संगमेश्वर ः विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेतर्फे समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत औपचारिक कार्यात्मक शिबिराचे आयोजन सोमवारी (ता.६) सकाळी १० वाजता देवरूख येथील ग्रामीण रुग्णालयात केले आहे.

या शिबिरामध्ये ० ते १८ वयोगटातील ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व कार्ड यांची गरज आहे. अशा पात्र विद्यार्थ्यांना कार्ड मिळणार आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी संबंधित शाळेतील शिक्षक, केंद्रीय विशेष शिक्षक, अंगणवाडी सेविका, संबंधित केंद्रातील आशा सेविका मदत करणार आहेत. ग्रामपंचायत येथे आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी युडीआयडी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांसह www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून नोंदणी केलेला अर्ज व पावती सोबत घेऊन ६ ऑक्टोबरला ग्रामीण रुग्णालय येथे उपस्थित राहावे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 06-10-2025