Chiplun : संदीप मुंढेकर यांना आदर्श उपक्रमशील शिक्षक पुरस्कार

चिपळूण : रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोलीतर्फे सन २०२५ साठीचा महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील शिक्षक पुरस्कार चिपळूण युनायटेड इंग्लिश स्कूलचे हिंदी, इतिहास विषयाचे शिक्षक संदीप काशिराम मुंढेकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख गोविंद राठोड यांच्याहस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशिद, राष्ट्रीय उपाध्यक्ष भरत पाटील पर्यटन विभाग कोकण अध्यक्ष बाळासाहेब नकाते, कार्याध्यक्ष संजय खटके यांच्यासह राज्यातील मान्यवर व पुरस्कार विजेते उपस्थित होते.

मुंढेकर एनसीसी अधिकारी म्हणून काम पहात आहेत. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन केले आहे. त्यांची विद्यार्थिनी राज्याच्या गुणवत्ता यादीत ग्रामीण भागात पहिली आली होती. एकूण २०० च्या वर विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक एस.सी.सी. परीक्षा बोड एक्झामिनर, मॉडरेटर, पेपर सेटर, ऑफीसर ट्रेनिंग अकॅडमी कामठी नागपूर येथे ३ महिने लष्करी प्रशिक्षण अल्फा ग्रेड मध्ये पूर्ण केले.

रिफ्रेशर कोर्स १ महिन्याचे दोन पूर्ण केले. दिल्ली येथे नॅशनल कॅम्प ३ वेळा १० दिवसाचे यात सहभाग, गया बिहार येथे ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प पूर्ण केला. राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 06/Oct/2025