अध्यापनात ई-तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक : डॉ. मनोहर कोंडागुर्ले

राजापूर : अध्यापन प्रभावी होण्यासाठी पारंपरिक साधनांपेक्षा नवीन ई साधनांचा वापर आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाने अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक प्रभावी व परिणामकारक करता येते. आपले अध्यापन प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी आधुनिक ई तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असून आपण सर्वांनीच या साधनांचा वापर करून अध्यापन परिणामकारक करूया, असे आवाहन डॉ. मनोहर कोंडागुर्ले यांनी केले.

रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयात स्टाफ अॅकॅडमी आयोजित ‘अध्ययन अध्यापन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम होते.

आपण सर्वजण अध्यापनात ई मीडियाचा वापर करतोच, पण अध्यापन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी नवनवीन येणारे तंत्रज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे आणि त्या साधनांच्या साह्याने विद्यार्थ्यांना अध्यापन केल्यास अध्यापन अधिक प्रभावी होईल. त्यासाठी आपण सर्वांनीच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करूया, असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्टाफ अॅकॅडमी प्रमुख डॉ. बी. टी. दाभाडे, तर आभार प्रदर्शन प्रा. एन. जी. देवन यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 06/Oct/2025