रत्नागिरी : शहरातील कै. ल.ग. पटवर्धन शाळेत शारदोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे मॅडम यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शाळेतील शिक्षिका सौ. नेने मॅडम यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवन चरित्रावर कीर्तन सादर केले एखाद्या शुर वीरांगना स्त्रीची गाथा मुलांसमोर मांडावी तसेच कीर्तन भक्तिरसाची विद्यार्थ्यांना माहीती व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. रोज एका एका वर्गाला पूजा आरतीची संधी देण्यात आली. शेवटच्या दिवशी सौ. ऋतुजा कुळकर्णी यांनी स्वातंत्रसैनिकांच्या कथा सांगितल्या. विद्यार्थी वीरकथा ऐकून भारावून गेले.
नऊ दिवस चालणारा हा नवरात्र उत्सव आनंदाने पार पडला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 23-10-2024













