खेड : रसाळगड किल्ल्यावर यंदा पहिल्यांदाच रसाळगड दीपोत्सव साजरा होणार आहे. जी. टी. अॅडव्हेंचर, महाराजा प्रतिष्ठान खेड आणि शिवसह्याद्री ट्रेकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑक्टोबरला हा सोहळा होणार आहे. पहिला दिवा माझ्या राजाला या संकल्पनेतून महाराजांना दीप अर्पण करून किल्ल्यावर दिवाळीचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
सायंकाळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीप व मशाल महोत्सव, अभिषेक व प्रसाद तसेच रात्री जागरण या कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 06/Oct/2025














