Ratnagiri : श्रीराम मंदिरात आज काव्य मैफल

रत्नागिरी : कोजागरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी (ता. ६) सायंकाळी साडेचार वाजता शहरातील रामआळी येथील श्रीराम मंदिरच्या प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थान येथे मंदिर सभागृहात काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या मैफलीत सर्व नामवंत व नवोदित कवीवर्यांनी तसेच चोखंदळ रसिकांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहून मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन काव्य मैफल प्रमुख डॉ. दिलीप पाखरे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 06/Oct/2025