ब्रेकिंग : Nagarpalika and Nagarparishad Reservation | राज्यातील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा; रत्नागिरीत महिला नगराध्यक्ष!

Nagarpalika and Nagarparishad Reservation: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली.

यामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेसाठी महिला आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे.

33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासन वेगाने तयारीला लागले आहे. सोमवारी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृह येथे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमधे प्रचंड उत्सुकता होती. आता जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा किंवा तोटा होईल, हे आता काहीवेळातच समोर येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 06-10-2025