Rajapur : फिश कंपनीजवळील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन; दोघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील आरएसएफ फिश कंपनीजवळील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वा. सुमारास करण्यात आली.

रामदिन गुखराम डंगोरा (३५) आणि कुकुलाल भारतलाल थारु (५४, दोन्ही मूळ रा. नेपाळ सध्या रा. साखरी नाटे, राजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस कॉस्टेबल सचिन आडबे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, हे दोन्ही संशयित आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना आरएसएफ फिश कंपनीजवळील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत होते. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 06/Oct/2025