Ratnagiri : नाचणे रोड येथील रंगशाळा विद्यालयात २४ ते २६ ऑक्टोबर रोजी अभिनय कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी : नाचणे रोड येथील रंगशाळा सिने-नाट्य विद्यालयातर्फे २४ ते २६ ऑक्टोबर या दिवाळी सुट्टीच्या दिवसात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळात सात वर्षावरील सर्वांसाठी अभिनय कौशल्य कार्यशाळा होणार आहे.

कार्यशाळेत मंचाभिनय, कॅमेऱ्यासमोरील अभिनय तंत्र, सभाधीटपणा, संवाद कौशल्य, वाचिक अभिनय, उच्चारण, स्पष्टतेचे व्यायाम, आंगिक अभिनय, आवाजाची जोपासना, भूमिका अभ्यास, हावभाव, कल्पनाशक्ती, निरीक्षण क्षमता, स्टोरी बिल्डींग आदींचा समावेश आहे. सात वर्षावरील सगळ्यांनी सुट्टीचा फायदा घेऊन अभिनय कौशल्य कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन रंगशाळा विद्यालयाचे विभाग प्रमुख प्रदीप शिवगण यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 06/Oct/2025