Ratnagiri Deo Ghaisas Keer College : देव, घैसास, कीर महाविद्यालयात व्यावसायिक पत्रलेखन व ई-मेल कार्यशाळा

रत्नागिरी : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाने व्यावसायिक पत्रलेखन व ई-मेल लेखन कार्यशाळा आयोजित केली. इंग्रजी विभाग व आयक्यूएसीच्या सहकार्याने अर्हतावर्धक इंग्रजी विषयाच्या तिन्ही शाखेच्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा झाली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सरावात पत्रलेखन केले. ई-मेल तयार करून पाठवला, ज्यामुळे कोर्समध्ये शिकलेल्या तंत्रांचा प्रत्यक्ष वापर करण्याचा अनुभव मिळाला. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. वसुंधरा जाधव यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 06/Oct/2025