Rajapur : गजा नृत्य स्पर्धेत ‘यंग स्टार ओझर संघ’ विजेता

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचलकोंड-धनगरवाडी येथील युवा मित्रमंडळातर्फे स्वर्गीय महादेव पटकारे यांच्या स्मरणार्थ पाचल येथील श्री महागणपती सभागृहात दसरा सोहळा पार पडला. या सोहळ्यात पारंपरिक धनगरी गजा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत यंग स्टार ओझर संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘लक्ष्मी माता करक’ संघाला द्वितीय क्रमांक मिळाला.

कार्यक्रमाला भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य पाटील (शाहुवाडीकर), पाचलचे उपसरपंच आत्माराम सुतार, माजी सरपंच अपेक्षा मासये, माजी उपसरपंच किशोर नारकर, विलास परुळेकर, यांच्यासह सुमारे ५५० समाजबांधव उपस्थित होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांचा पुण्यश्लोक अहिल्याबाईची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ‘यंग स्टार ओझर’ संघाने आयोजक मंडळाचा विशेष सत्कार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 06/Oct/2025