मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. महायुतीत भाजपाने ९९ जागांसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्यानंतर मनसेचे ४५ जणांची दुसरी यादी घोषित झाली.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय गायकवाड यांच्यासह बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या यादीत कोणाचा समावेश?
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे
साक्री – मंजुळाताई गावित
चोपडा – चंद्रकांत सोनावणे
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
पाचोरा – किशोर पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
बुलढाणा – संजय गायकवाड
मेहकर – संजय रायमुलकर
दर्यापूर – अभिजीत आनंदराव अडसूळ
रामटेक – आशिष जैस्वाल
भंडारा – नरेंद्र भोंडेकर
दिग्रस – संजय राठोड
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
कळमनुरी – संतोष बांगर
जालना – अर्जून खोतकर
सिल्लोड – अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजीनगर पश्चिम – संजय शिरसाट
पैठण – विलास भुमरे
वैजापूर – रमेश बोरनारे
नांदगाव – सुहास कांदे
मालेगाव बाह्य – दादाजी भुसे
ओवळा माजिवडा – प्रताप सरनाईक
मागाठाणे – प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी पूर्व – मनीषा रवींद्र वायकर
चांदिवली – दिलीप भाऊसाहेब लांडे
कुर्ला – मंगेश कुडाळकर
माहिम – सदा सरवणकर
भायखळा – यामिनी जाधव
कर्जत – महेंद्र थोरवे
अलिबाग – महेंद्र हरी दळवी
महाड – भरतशेठ गोगावले
उमरगा – ज्ञानराज चौगुले
परांडा – तानाजी सावंत
सांगोला- शहाजी बापू पाटील
कोरेगाव – महेश शिंदे
पाटण – शंभूराज देसाई
दापोली – योगेश कदम
रत्नागिरी – उदय सामंत
राजापूर – किरण सामंत
सावंतवाडी – दीपक केसरकर
राधानगरी – प्रकाश आबिटकर
करवीर – चंद्रदीप नरके
खानापूर – सुहास बाबर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 23-10-2024














