Chiplun Nagar Parishad : चिपळूण नगर परिषदेकडून शुभेच्छा जाहिरात फलकांवर जप्तीची कारवाई सुरू

चिपळूण : चिपळूण नगर परिषद प्रशासनाने आज शहरातील शुभेच्छांचे जाहीरात फलक हटविण्याची कार्यवाही सुरू केली. कार्यवाही केलेल्या बहुतांश जाहीरात फलकांमध्ये विविध राजकीय पक्ष्यांचे नेते व पुढाऱ्यांच्या फलकांचा समावेश होता.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची लवकरच रणधुमाळी सुरू होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्यातील सुमारे साडेचार वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक पूर्वीचा कालबद्ध कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीतील निवडणुकांसंदर्भात नगराध्यक्ष पदाचे आरक्षण मुंबई येथे जाहीर करण्यात आले.

यानंतर प्रभागातील आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर किंवा डिसेंबर अखेर कधीही जाहीर होऊ शकतात. याचा अंदाज घेत न.प. प्रशासनाने देखील पूर्वतयारी म्हणून शहरातील जाहिरात फलक काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 07/Oct/2025