खेड : खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत आज मुंबई मंत्रालय येथे काढण्यात आली. त्यात (सर्वसाधारण महिला) असे आरक्षण जाहीर आहे. मागील निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण होते. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभव खेडेकर हे निवडून आले होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे यांनी निवडणूक लढवली होती. वैभव खेडेकर यांच्या कार्यकाल संपल्यानंतर सुमारे चार वर्षांनंतर आता निवडणुका होणार आहेत.
महिला सर्वसाधारण महिलेला हे पद मिळाल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार शोधण्यात गुंतले आहेत. वैभव खेडेकर यांना मनसेतून बडतर्फ केल्याने त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपाचे खेडमध्ये वजन वाढलेले आहे. राज्यात जरी शिवसेना आणि भाजप यांची युती असली तरी खेडमध्ये युती होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. आजच्या आरक्षण सोडतीमुळे वैभव खेडेकर यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 07/Oct/2025














