गुहागर : आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांची घोषणा पर्यावरण विभाग व पर्यटन संचालनालय यांनी केली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्रकिना-याबरोबर दापोलीतील समुद्रकिनाऱ्याचाही सामावेश आहे. यामुळे कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असलेल्या गुहागरच्या पर्यटन वाढीला मोठा हातभार लागणार आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातील एकही समुद्रकिनारा या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी निवड झालेला नसताना मुख्यमंत्र्यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरला आहे. तर या वर्षअखेरपर्यंत मुख्यमंत्री स्वतः या समुद्रकिनाऱ्यांना भेट देणार आहेत.
मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी गुहागरच्या पर्यटनवाढीसाठी हे धाडसी मोठे पाऊल उचलले असून याला पहिल्या टप्प्यामध्ये यश आले आहे. ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी गुहागर नगरपंचायतीकडून प्रस्ताव गेल्यानंतर गुहागर समुद्रकिनाऱ्यावर १२ ते १४ ऑगस्टमध्ये राष्ट्रीय ऑपरेटर व ब्ल्यू फ्लॅग कमिटीने भेट दिली होती. या भेटीनंतर केलेल्या मुल्यांकनानुसार ही निवड करण्यात आली आहे. ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा हा वर्षभरात ब्लू फ्लॅग मानांकनासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उभ्या करण्यासाठी देण्यात आला आहे. यासाठी ६ किलोमिटर विस्तीर्ण असणाऱ्या गुहागर समुद्रकिनाऱ्यापैकी गुहागर पोलिस परेड मैदानच्या मागील बाजुचा एक किलोमिटरचा किनारा आरक्षित करण्यात आला आहे.
वर्षभरात उभारणार सोयीसुविधा ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जामध्ये वर्षभरात या पाचही समुद्रकिनाऱ्यावर उभारायच्या आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व बंदर विभागाकडून गुहागर नगरपंचायतीला जमिन हस्तांतरण करावी लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री पर्यावरण विभाग, पर्यटन विभाग यांचा समन्वय कसा राहतो याकडे लक्ष लागले आहे. समुद्रकिनारी सौचालय, चेंजोंग रूम,
शॉवर पॅनल, जलशुद्धिकरण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प, शुद्ध पीण्याचे पाणी व्यवस्था, समुद्रकिनाऱ्यावर जाणारा सुस्सज रस्ता, पथदीप, बसण्यासाठी बाके, समुद्रकिनाऱ्यावर छत्री व आराम खुर्चा, ओपन जीम, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, पार्कंग व्यवस्था, किनाऱ्यावर छोटे-छोटे कोकणी उत्पादन विक्रीचे स्टॉल, अग्रीशामन वाहन आदी सुविधा उभाराव्या लागणार आहेत. यामुळे पुढील वर्ष गुहागरवासीयांसाठी या सुविधा उभारणीचे आव्हान ठरणार आहे.
गुहागर नगरपंचायतीने यातील बहुतांशी सुविधा सुरू केल्या असून लवकरच अग्रीशमन वाहनही उपलब्ध होणार असून या सर्व सुविधा उभारणीसाठी प्रयत्नशील आहे. तर पर्यटन वाढीसाठी हे महत्वाचे पाऊल ठरले आहे.
पर्यटन वाढीसाठी मुख्यमंत्र्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
ब्ल्यू फ्लॅग राष्ट्रीय ज्युरी सदस्य व राष्ट्रीय ऑपरेटर यांनी महाराष्ट्रातील १० समुद्रकिनाऱ्यांची पाहणी केली होती. त्यापैकी या पाहणीनंतर केलेल्या मूल्यांकनातून सन २०२५-२०२६ या हंगामासाठी पाच समुद्रकिनाऱ्यांची ‘ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा’ प्रदान केला आहे. यामध्ये डहाणूमधील पारनाका बीच, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व नागाव बीच तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर बीच यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसाठी मुख्यमंत्र्यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असून, मुख्यमंत्री स्वतः या प्रकल्पाकडे लक्ष देणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 07/Oct/2025














