देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे देवरूख येथील दत्ताराम पेंढारी यांच्या गोठ्यावर वीज पडून गोठ्यातील दोन बैल व एक दुभती गाय मृत्युमुखी पडली असून, ३ जनावरे जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेत पेंढारी यांचे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोमवारी रात्री ९ वा. ही घटना घडली आहे. ही बाब पशुवैद्यकीय अधिकारी यांना समजताच घटनास्थळी धाव घेतली. यात जखमी गुरांवर उपचार करणे व मृत्यू पडलेल्या गुरांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. घटना घडताच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकायनि या घटनेत जखमी झालेल्या जनावरांना सुखरूप बाहेर काढून मदतकार्य करण्यात आले. घटनेचा पंचनामा तलाठी द्वारकेश तायडे, ग्रामसेवक समीक्षा मोहिते, सरपंच सुनील सावंत, ग्रामपंचायत सदस्या अनुष्का सावंत यांनी केला.
यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. या घटनेच्या पंचनाम्यात पेंढारी यांचे सुमारे एक लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पेंढारी यांच्या गोठ्यावर वीज पडून मोठे नुकसान झाले आहे. जखमी जनावरांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले असून जखमी तीन गायी सुखरुप आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 23-10-2024














