Rajapur : पाचल-जवळेथर रस्त्याची अक्षरशः चाळण!

पाचल : पाचल-जवळेथर रस्त्या दरम्यान मूर सुतारवाडी ते तळवडे-ताम्हाणे फाटा या ७ कि.मी. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहनचालकांना खड्डे चुकवताना दमछाक होत आहे. या रस्त्यावरील अर्जुना पुलावर देखील मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. या रस्त्याचे तत्काळ डाबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषेद निवडणुकांवर याचे पडसाद उठतील, असा संतप्त इशारा नागरिकांनी दिला आहे.

सातत्याने पडणारा मुसळधार पाऊस, रस्ता दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे झालेले दुर्लक्ष मो-यांची दुरवस्था आणि साईडपट्या देखील गायब झाल्याने रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. एकदा मोठा अपघात अथवा मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त जनतेमधून विचारला जात आहे.

पंचायत समिती व जि. प. परिषदेच्या निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. महिन्याभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने या रस्त्याचे काम तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे, अन्यथा रस्त्याचे काम पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. येत्या होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकापुर्वी या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास याची जबर किंमत प्रत्येक राजकीय पक्षाला मोजावी लागेल, असा स्पष्ट इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 07/Oct/2025