खेड : माजी पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या गलिच्छ आणि वैयक्तिक आरोपांच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ६) शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी व कार्यकत्यांनी प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून अनिल परब यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर वैयक्तिक स्तरावर आणि त्यांच्या कुटुंबावर घाणेरडे आरोप केल्याचा आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाने केला आहे. राजकारण करताना वैचारिक विरोध अपेक्षित असतो; मात्र प्रत्येकवेळी कुटुंबावर टीका करून राजकारणाला गलिच्छ वळण देण्याचा प्रकार अमान्य असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सचिन धाडवे यांनी सांगितले, राजकारणात विचारांची लढाई असावी, वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर हल्ले करणे हे नीच राजकारणाचे उदाहरण आहे. अशा वक्तव्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 07/Oct/2025














