चिपळूण : महावितरण कंपनीच्या स्मार्ट प्री-पेड मीटर योजनेविरोधात खेर्डी व पेढे जिल्हा परिषद गट महाविकास आघाडी व सर्वसामान्य जनता यांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मंगळवारी (ता. ७) सकाळी १० वाजता प्रभातनाका, एमआयडीसी रोड येथून निघून महावितरणच्या खेर्डी कार्यालयावर धडकणार आहे.
या संदर्भात माहिती देताना युवासेनेचे तालुका अधिकारी उमेश खताते म्हणाले, स्मार्ट प्री-पेड मीटर मोफत असल्याची जाहिरात केली जात असली तरी प्रत्यक्षात या मीटरचा खर्च थेट ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून अल्प अनुदान दिल्यानंतर उर्वरित खर्च वीज दरवाढीच्या स्वरूपात ग्राहकांवर लादण्यात येईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 07/Oct/2025














