Ratnagiri : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोजगारक्षम अभ्यासक्रमांचे उद्या होणार उद्घाटन

रत्नागिरी : उद्योग ४.० युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व सेवाक्षेत्राशी सुसंगत प्रशिक्षण देऊन औद्योगिक क्षेत्राला आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ला दुपारी ३ वाजता सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या या नव्या अभ्यासक्रमांचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे.

रत्नागिरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता जिल्ह्यातील विविध कार्यालयांमार्फत औद्योगिक आस्थापना, औद्योगिक संघटना, लाडकी बहीण योजनाचे लाभार्थी, पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम योजनेचे लाभार्थी, द्विलक्षी अभ्यासक्रमाचे लाभार्थी यांना निमंत्रित केले आहे. या वेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य शशिकांत कोतवडेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 07/Oct/2025