Kokan Railway : एलटीटी-तिरूवअनंतपूरम २७ नोव्हेंबरपर्यंत धावणार

खेड : कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी २५ सप्टेंबरपासून चालवण्यात येत असलेली एलटीटी- तिरूवअनंतपूरम रेल्वे २७ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.

एलटीटी-तिरूवअनंतपूरम साप्ताहिक स्पेशल एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटते. दुसऱ्या दिवशी रात्री ८.४५ वाजता तिरूवअनंतपूरमला पोहोचते. परतीच्या प्रवासात तिरूवअनंतपूरम येथून सायंकाळी ४.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वाजता एलटीटीला पोहोचते. कोकण मार्गावर स्पेशलला पनवेल, पेण, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, मडगाव स्थानकात थांबे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 07/Oct/2025