Ratnagiri : जिल्ह्यात ७७७ क्षयरूग्णांची संख्या

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने जिल्हा टीबीमुक्तीकडे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जिल्ह्यात सर्व्हे ही सुरू करण्यात आला आहे. गतवर्षी ९२२ क्षयरूग्णांची संख्या होती. ती आता ४० टक्क्यांनी कमी होवून आता जिल्ह्यात केवळ ७७७ इतकी क्षयरूग्णांची संख्या राहिली आहे. डिसेंबरपर्यंत सर्व्हे झाल्यानंतर जिल्हा खऱ्या अर्थाने टीबी मुक्त होईल, असेही सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात २०१५ साली क्षय रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यानंतर विशेष मोहिम, जनजागृती, सर्व्हेमुळे जिल्ह्यातील ४० टक्के टीबी रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायती, शहर, विविध तालुक्यात मागील वर्षी २४०० संख्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला होते. त्यापैकी वर्षभरात २ हजार १३६ इतके क्षयरुग्णांचे निदान झाले. ८९ टक्के इतके उद्दिष्ट प्राप्त झाले. मागील वर्षी जानेवारी ते मे २०२४ साली जिल्ह्यात ९२२ क्षयरुग्ण आढळले होते. तर यंदाच्या वर्षी ७७७ इतके रुग्ण आढळले आहेत. त्यावर उपचार सुरू असून तेही लवकरच बरे होतील असेही सांगण्यात आले. एकूणच जिल्हाचा प्रवास टीबीमुक्तीच्या दिशेने सुरू आहे.

जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत टीबीमुक्त अभियान…
रत्नागिरी जिल्हा हा टीबीमुक्त व्हावा यासाठी क्षयरोग विभागाच्या वतीने विविध उपाय योजना राबवत आहेत. जिल्ह्यात १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यात हे अभियान सुरू झाले आहे. त्यासाठी ३७६ उपकेंद्रांची टीम, १,४०१ आशा वर्कर व विविध कर्मचारी घरोघरी सव्र्व्हे करणार आहेत. जेणेकरून वर्षभरात जिल्हा टीबी मुक्त होईल, यासाठी प्रयत्न करणार आहेत.

रत्नागिरी जिल्हा टीबीमुक्त व्हावा यासाठी डिसेंबरपर्यंत विभागाच्यावतीने सर्व्हे घेण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात कित्येक अश्या व्यक्ती आहेत, टीबीचा त्रास आहे मात्र सांगत नाहीत. त्यामुळे लक्षणे असल्यास लपवू नये, त्वरीत दवाखान्यात दाखवावे. क्षयरोग विभागाचे अधिकारी आल्यास त्यांना माहिती द्यावी, योग्य निदान झाल्यास आजार बरा होतो- महेंद्र गावडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 07/Oct/2025