रत्नागिरी जिल्हा पुनर्वसन समितीच्या सदस्यपदी नीलेश कदम

चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडीचे माजी सरपंच नीलेश कदम यांची जिल्हा पुनर्वसन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न मार्गी लागण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ही समिती स्थापन केली आहे. कदम हे अलोरे, कोळकेवाडी, पोफळी परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या मार्गी लागण्यासाठी गेली काही वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहेत.

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा पुरेपूर अभ्यास करून मंत्रालयापर्यंत विविध बाबींचा पाठपुरावा करत आहेत. जिल्हा पुनर्वसन समितीत अध्यक्ष म्हणून अपर जिल्हाधिकारी, सचिव जिल्हा पुनर्वसन अधिकारी, प्रकल्प सुरू असलेल्या विभागाचे कार्यकारी अभियंता, भूसंपादन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय अशासकीय सदस्य म्हणून चौघांची नियुक्ती झाली असून, त्यात चिपळूण तालुक्यातून कदम यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 07/Oct/2025