रत्नागिरी : नववी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या योजनेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार असल्याने याचा त्यांना फायदा होणार आहे.
राज्याच्या योजनेपेक्षा केंद्राच्या योजनेतून विद्यार्थ्यांना अधिक शिष्यवृत्ती मिळणार आहे. सरकारने देखील केंद्राच्या योजनेतून विद्यार्थ्यांना जास्त शिष्यवृत्ती मिळते म्हणूनच हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. ही योजना सुरू होऊन आता पंधरा वर्षांचा काळ झाला आहे. त्यानंतर या योजनेत बदल करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
झेडपीच्या शिकणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २०१०-११ पासून आदिवासी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शिष्यवृत्तीच्या योजनासुद्धा राबवल्या जात आहेत. अनुसूचित जमाती अर्थात एसटी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी देखील शासनाकडून वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात.
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू होती; पण आता राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना केंद्राची पूर्व सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना असे या शिष्यवृत्ती योजनेचे नाव आहे. या योजनेतून वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना वेगवेगळे भत्ते पण दिले जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 07/Oct/2025














