Ratnagiri : जिल्हास्तरीय टेनिक्काईड स्पर्धेत युनायटेड इंग्लिश हायस्कूल विजयी

चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय टेनिक्वाईड (रिंगटेनिस) स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल मधील 14 वर्षे वयोगटांमध्ये मुली अंतिम सामन्यात विजयी झाला.

या संघात अनन्या गिरकर, तन्वी साळवी, श्रावणी हळदे, समृद्धी देर्देकर या विद्यार्थिनींचा समावेश होता. या मुलांनी माखजन हायूस्कूल च्या मुलीचा परभव करून अंतिम सामन्यात विजय मिळवला व त्यांची निवड विभागिय स्पर्धेसाठी झालेली आहे. तर 19 वर्षे वयोगटामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत व्दितीय क्रमांक.

या संघामध्ये इशिका आग्रे, आरोही शिंदे, पौर्णिमा जाधव, मीरा होलेकर यांचा समावेश होता. विजयी संघाला क्रीडा अधिकारी श्री सचिन मांडवकर सरांनी शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमुख श्री समीर कालेकर सर व माजी विद्यार्थी निखिल वारके यांचे मार्गदर्शन लाभले तर व्यवस्थापक म्हणून कु निकीता लब्धे मॅडम यांनी काम केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध सर उपमुख्याध्यापक श्री संजय बनसोडे पर्यवेक्षिका सौ. रेवती कारदगे तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर चिपळूण शहरातील नागरीक व पालकांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 07/Oct/2025