Breaking : किरण सामंत उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

राजापूर : काल रात्री उशिरा शिवसेनेच्या विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये राजापूर मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या सोबत किरण सामंत यांची लढत होणार आहे.

किरण सामंत उद्या दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रथम राजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार असून त्यानंतर एका सभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या सभेनंतर किरण सामंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 23-10-2024