गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमेपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात दररोज संध्याकाळी ७ ते ७:१५ यावेळेमध्ये मंदिराचे गर्भगृह आणि परिसरातील सर्व विद्युत दिवे बंद करून फक्त तेल वातीचे दिवे, समई पणत्या लावल्या जातात. सोमवारपासून त्याची उत्साहात सुरुवात करण्यात आली.
या मंगलमय वातावरणात होणारी श्रींची आरती आणि दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी असंख्य भाविक व गणपतीपुळे दशक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित असतात. त्रिपुरारी पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होते. या सोहळ्यासाठी अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध नियोजन श्री देव गणपतीपुळे संस्थानमार्फत करण्यात आले आहे, अशी माहिती देतानाच सर्वांनी या विहंगम अशा सोहळ्याला उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 07/Oct/2025














