राजापूर : घराच्या पाठीमागील पडवीत विक्रीसाठी ठेवलेला गोवा बनावटीचा साठा नाटे पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी गावेलकरवाडी येथे करण्यात आली.
संजना संजय गावेलकर (वय ३५, रा. गावेलकरवाडी-देवाचेगोठणे, राजापूर) असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात कॉन्स्टेबल दामिनी पेडणेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित महिलेच्या घराच्या पाठीमागील पडवीत एका कोपऱ्यात गोवा बनावटीच्या गैरकायदा दारुच्या बाटल्या ठेवण्यात आलेल्या होत्या. पोलिसांनी एकूण ८२० रुपयांच्या ३० बाटल्या जप्त केला आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 07/Oct/2025














