लांजा : लांजा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण निश्चित करण्याकरिता प्रभागांची आज (ता. ८) आरक्षण सोडत आहे.
नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात येणार आहे. ही सोडत आज सकाळी ११ वाजता लांजा शहरातील संकल्प सिद्धी बहुउद्देशीय सभागृह येथे पार पडणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 08-10-2025













