रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुले शोध व तपासणी मोहीम आज (ता. ८) सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शीघ्र निदान केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे.
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र एस. डी. पाथरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 08/Oct/2025














