◼️ पालकमंत्री उदय सामंत यांच्या निर्णयाचे मिऱ्यावासियांकडून स्वागत
रत्नागिरी : येथील मिऱ्या जाकिमिऱ्या प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्र भूसंपादनाला ग्रामस्थांनी विरोध केला होता. याविषयी उद्योग तथा पालकमंत्री यांनी ग्रामस्थांशी चर्चाही केली होती. मात्र स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असेल तर प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्र भूसंपादन रद्द करण्यात आल्याचे पत्र पालकमंत्री यांनी ११ ऑक्टोबर रोजी आम्हाला दिले आहे. मात्र, यावर आता काहीजण राजकारण करत आहेत. परंतू आम्ही पालकमंत्र्यांसोबत असल्याची माहिती मिऱ्या येथील दिनेश सावंत, भैया भाटकर तसेच ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली.
आम्ही प्रकल्प रद्द करु, असे काहीजण राजकारण करत आहेत. मूळात पालकमंत्री सामंत यांनी ११ ऑक्टोबरलाच हा प्रकल्प रद्द झाल्याचे पत्र आम्हाला दिले असताना यावर राजकारण होत आहे. मौजे मिऱ्या येथे एमआयडीसीकडून प्रकल्पास ग्रामस्थांची संमती नसेल तर त्यांच्यावर जबरदस्तीने प्रकल्प लादण्यात येणार नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला ग्वाही दिली होती त्याप्रमाणे त्यांनी शब्द पाळला आहे. ना. सामंत यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या, जागेला योग्य भाव मिळाल्यास या प्रकल्पाला आमचा विरोध नसेल. मात्र, काहीजण राजकारण करीत असल्यामुळे आता आम्हाला पत्रकार परिषदेत घ्यावी लागली.
मिऱ्या येथील प्रस्तावित एमआयडीसीमुळे गावातील मंदिर किंवा कोणतीही घरे पाडली जाणार नाहीत, असेही उदय सामंत यांनी आम्हाला सांगितले आहे. जागेला योग्य भाव मिळाल्यास या प्रकल्पाला आमचा विरोध नसेल. इतर कोणीही यावर राजकारण करु नये, असे भैया भाटकर, दिनेश सावंत व इतर ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी निषांत सावंत, अजित सावंत, बावा नार्वेकर, अंकुश शिवलकर, परेश सावंत, आदिती भाटकर, अनिता शिरधनकर, अमेय शिवलकर, सुभाष शिरधनकर, सुरेंद्र शिरधनकर, गुरुप्रसाद माने, प्रभाकर शिवलकर, पप्पू शिवलकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 23-10-2024













