Ratnagiri : राजिवडा येथे नौकेतील ९० हजारांच्या इंजिनची चोरी

रत्नागिरी : शहराजवळील राजिवडा येथे मासेमारी जेटीच्या बाजूला पाण्यात उभी करून ठेवलेल्या बोटीवरील ९० हजारांचे इंजिन चोरट्यांने चोरून नेले. याची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. ही घटना ४ ते ५ ऑक्टोबर सकाळी राजिवडा मासेमारी जेटी येथील समुद्राच्या पाण्यात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोएब रियाज फणसोपकर (वय ३३, रा. राजिवडानाका, रत्नागिरी) यांच्या पत्नीच्या नावे असलेली मासेमारी बोट-सना जोया ही शनिवारी (ता. ४) रात्री साडेनऊ ते रविवारी (ता. ५) सकाळी साडेसात या वेळेत समुद्राच्या पाण्यात उभी करून ठेवली होती. चोरट्याने बोटीवरील ९.९ हॉर्स पॉवरचे ९० हजारांचे इंजिन पळवले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 08/Oct/2025