चिपळूण : तालुक्यातील मूर्तवडे येथील पोस्टात दोन लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर यशवंत रहाटे (रा. मूर्तवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत डाकघर निरीक्षक हिमांशू जोशी यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना १८ डिसेंबर २०१७ ते ७ नोव्हेंबर २०१८ तसेच २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मूर्तवडे येथील पोस्टात घडली. ज्ञानेश्वर रहाटे हा मूर्तवडे शाखा डाकघर येथे पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होता. या वेळी पोस्टाचे खातेदार रामचंद्र महादेव मांडवकर व वासंती रामचंद्र मांडवकर (दोघेही रा. मूर्तवडे) यांची पाच वर्षे मुदतीची खाती न उघडता बनावट पासबूक तयार करून दोन लाख रुपये रक्कमेचा अपहार केला आहे. ही बाब पोस्टखात्याच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधिताने दोन लाखांची ठेव व त्यावर मिळणारे व्याज असे एकूण ३ लाख रुपये डाक विभागाकडे भरणा केले; मात्र खातेदारांची खाती न उघडता दोन लाखांच्या फसवणूकप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 08/Oct/2025














