Kiran Samant | धनगर समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध : आमदार किरण सामंत

पाचल : शासनाच्या योजनेमधून तांडा वस्ती राजापूर-लांजा तालुक्यासाठी २ कोटी. ५० लाख रुपयांचा निधी आपण मंजूर केला असून लवकरच या कामांचा शुभारंभकरण्यात येणार आहे. आपल्या ज्या काही मागण्या आणि विकास कामे आहेत, ती मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असलेल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले.

पाचल पंचक्रोशी धनगर समाजाच्यावतीने तळवडे येथील प्रभावती हॉलमध्ये दसरा सोहळा कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी आमदार किरण सामंत यांच्या सुकन्या अॅड. अपूर्वा सामंत म्हणाल्या, माझे वडील आमदार होण्यामागे आपल्या समाज बांधवांचे फार मोठे योगदान आहे. हे मी कधीही विसरु शकत नाही. यामुळे आपली अपूर्ण कामे पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी आता माझी आहे. मात्र, आपल्या मतदारसंघात काही राजकीय लोक जातीपातीच्या राजकारण करून समाजात गैरसमज पसरवीत आहेत. अशा लोकांना आपण थारा देऊ नका. आम्हाला जातीचे नाही तर विकासाचे राजकारण करावयाचे असल्याचे अपूर्वा सामंत यांनी सांगितले.

यावेळी किरण सामंत आणि अॅड अपूर्वा सामंत यांचा धनगर समाज बांधवांच्यावतीने यथोचित सन्मान व गौरव करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या दसरा सोहळा कार्यक्रमाला समाज बांधवांनी तुडुंब गर्दी केली होती. या वेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त धाडसी मुली महिलांचा सन्मान, धनगरी गजा नृत्य स्पर्धा, कोकणची लोककला झाकडी नृत्य स्पर्धा, महिला हळदी-कुंकू अशा विविध कार्यक्रमाचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. पाचल पंचक्रोशी धनगर समाजाने पारंपरिक दसरा सोहळा कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून बहारदारपणे साजरा केल्याबद्दल सर्वच स्तरातून कार्यकर्तेचे कौतुक होत आहे.

यावेळी आमदार किरण सामंत, धनगर समाजाचे नेते प्रविण काकडे, नवराज काळे, तसेच आमदारांसोबत जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, तालुका प्रमुख दीपक नागले, युवा सेना तालुका प्रमुख सुनील गुरव, जिल्हा महिला उपसंघटक दुर्वा तावडे, विभाग प्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, उपविभाग प्रमुख युवराज मोरे, जेष्ठ कार्यकर्ते आप्पा साळवी, विभाग संघटक आत्माराम सुतार, संदीप बारसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 08/Oct/2025