चिपळूण : जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अवघ्या ६ महिन्यात आयुक्त, आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई कार्यालय यांच्याकडून प्रा. आ. केंद्र शिरगाव (ता. चिपळूण) येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयमध्ये श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव शासन निर्णय मंत्रिमंडळात सादर झाला आहे. त्यामुळे शिरगाव येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यासाठी एकूण अंदाजित खर्च २२ कोटी ३२ लक्ष रुपये तसेच सर्व निकष बाजूला ठेऊन या भागातील संवेदनशील ठिकाणे लक्षात घेता वस्तुस्थिती दर्शक प्रस्ताव आयुक्त कार्यालय, मुंबई यांसकडून शासनाला सादर करण्यात आला, मंत्रिमंडळ स्तरावर अंतिम मंजुरी करिता आमदार शेखर निकम सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शिरगांव ग्रामस्थांना दिला शब्द आहे.
या भागातील संवेदनशील ठिकाणांचा विचार केला असता एकूण १० ठिकाणे आहेत. त्यातील प्रामुख्याने कुंभार्ली घाट, कोळकेवाडी धरण, कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा ३ व ४, महानिर्मिती जनरेटींग स्टेशन पोफळी, कोयना सिंचन अंतर्गत कोळकेवाडी धरण व्यवस्थापन प्रकल्प, श्री. सुकाई, वरदायिनी, महाकाली मंदिर कुंभार्ली व श्रेणी यात्रा स्थळ तसेच ग्रामीण रुग्णालय कामथे ते पाटण या ७० किमी अंतरावर एकही ग्रामीण रुग्णालय नसून शिरगाव केंद्र हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढली आहे.
प्रा. आ. केंद्र शिरगाव अंतर्गत वार्षिक शस्त्रक्रिया व अती दक्षता रुग्णांची माहिती घेतली असता कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ४२ व छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया १८२, अपघात रुग्ण २५० ते ३०० आहेत. त्याचप्रमाणे विंचू दंश २८०, सर्प दंश ७१, श्वान दंश २५०, आरोपी रुग्ण २९५, हृदयविकार १८९, बायपास ४, आय. एच. दी. १०५, गरोदर माता नोंदणी, उपचार २२६, माता प्रसूती १७० व गरोदर माता मृत्यू १ अश्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा आरोग्य केंद्र शिरगाव अंतर्गत देण्यात येतात.
येथे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रा. आ. केंद्र शिरगाव कार्यक्षेत्रातील वाढती रुग्ण संख्या, संवेदनशील ठिकाणे व तेथील भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता आरोग्य सेवा या क्षेत्रात अधिक सक्षम करणे फार महत्वाचे आहे. यासाठी प्रा. आ. केंद्र शिरगावचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयत श्रेणी वर्धन करण्याची मागणी ग्रामस्थ सुरज शिंदे यांनी केली. त्यांच्या निवेदनाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अवध्या ६ महिन्याच्या अल्प कालावधीत आयुक्त आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई कार्यालय यांस कडून सर्व निकष बाजूला ठेऊन या भागातील संवेदनशील ठिकाणे लक्षात घेता वस्तुस्थिती दर्शक प्रस्ताव आयुक्त कार्यालय, मुंबई यांस कडून अंतिम मंत्रिमंडळ मंजुरी करिता शासनाला सादर केला आहे.
महामार्गावरील प्रवासी, वाहन चालकांना लाभ…
शिरगांव प्रा. आ. केंद्र हे राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ लगत असल्याने त्याचा लाभप्रवासी व वाहन चालक यांना मोठ्या प्रमाणात होतो. तसेच कार्यक्षेत्र व्यतिरिक रुग्ण ही मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवांचा लाभ घेतात, शिरगाव केंद्राची वार्षिक ओ.पी.डी. संख्या ३५,४३० असून तालुक्यातील इतर कोणत्याही आरोग्य केंद्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण आरोग्य सेवांचा लाभ घेताना दिसत नाहीत. प्रा. आ. केंद्र शिरगाव अंतर्गत एकूण ७उपकेंद्र असून कार्यक्षेत्र गावे ११ आहेत त्यामध्ये एकूण वाडा ११४ असून दुर्गम भागातील बाडपा २४ आहेत त्यांची एकूण लोकसंख्या २००९४ इतकी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 08/Oct/2025














