चिपळूण : तालुक्यातील गोवळकोट येथील गोविंदगड किल्ल्यावरील हिंदवी स्वराज्यासाठी झालेल्या ऐतिहासिक रणसंग्रामाची २९२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चिपळूणमध्ये व्याख्यान, गोविंदगड रन मॅरेथॉन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गोविंदगड किल्ल्यावरील लढाईत पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजीराव गोळे यांचे नातू आनंदराव गोळे आणि त्यांचे १० बंधू यांच्यासह शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करत बलिदान दिले. त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ‘गोविंदगड रन मॅरेथॉन’ स्पर्धा आणि ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदगड रन मॅरेथॉन स्पर्धा ४ गटांमध्ये घेण्यात आली.
लहान गट मुले-मुली आणि खुला गट मुले-मुली यांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान गट मुलांमध्ये पवन गौड, वीर पांडुरंग मेटकर, यतींद्र रोहिदास पारधी तर मुलींमध्ये इच्छा हरिचरण राजभर, रिद्धी सुनील भालेकर, अनुष्का अंकुश खेराडे यांनी यश मिळवले. खुला गट मुलांमध्ये ओंकार विष्णू बैकर, सुरज सुरेश कदम, यश मंगेश शिर्के तर मुलींमध्ये प्रमिला पांडुरंग पाटील, तन्वी भिकाजी मल्हार, श्रुतिका सुभाष वरक यांनी यश मिळवले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. चिपळूण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ऐतिहासिक गोविंदगड लढाईवर आधारित व्याख्यान झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 08/Oct/2025














