विधानसभा निवडणूक २०२४ : रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. तेथे येत्या २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्याची अधिसूचना काल जाहीर झाल्यानंतर आज निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली. आज पहिल्या दिवशी एकाही मतदारसंघात एकही अर्ज दाखल झाला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 23-10-2024