Khed : तिसंगी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात

खेड : खोपी प्रभागातील तिसंगी केंद्राची शिक्षण परिषद बिजघर कोंड शाळेत झाली. अध्यक्षस्थानी विजय सकपाळ होते. तुकाराम पार्टे यांनी श्रीफळ वाढवून शिक्षण परिषदेचे उद्घाटन केले. स्वागत बिजघर कोंडवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सरला मावळी, सूत्रसंचालन बिजघर कोंड शाळेच्या शिक्षिका जया दोरकर यांनी केले.

तिसंगी हायस्कूलचे शिक्षक शैलेश सकपाळ, बीजघर नंबर एक शाळेचे विजय सकपाळ व तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सरला मावळी, शिक्षिका जया दोरकर, विजय सकपाळ, संदीप घाणेकर, शैलेश पराडकर, नारायण शिरकर, रोहन देवकते, सुनिल जंगम, अंकिता भोसले, तृप्ती काताळे, अनुराधा शिंदे, ज्योती सांगळे यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 08/Oct/2025