Guhagar : धोपावे तरीबंदर येथे ग्रामपंचायतकडून स्वच्छता मोहीम

गुहागर : जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त धोपावे ग्रामपंचायत तर्फे धोपावे तरीबंदर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, स्थानिक नागरिक, मच्छीमार भगिनी तसेच महिला स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या मोहिमेदरम्यान किनाऱ्यावरील प्लास्टिक, थर्माकोल, कचरा तसेच इतर वस्तूंचे संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना प्लास्टिकमुक्तीसाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच स्वच्छ व सुंदर किनारा राखण्यासाठी ग्रामस्थांनी सतत सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 08/Oct/2025