Breaking : रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक २०२५: आरक्षण सोडत जाहीर!

​रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज, दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहात ही सोडत प्रक्रिया पार पडली, ज्यामुळे निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या तयारीला आता वेग येणार आहे.

​या सोडतीत प्रभागनिहाय आरक्षणाचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. अनेक प्रभागांमध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि अनुसूचित जाती (एस.सी.) साठी आरक्षण निश्चित झाले आहे.

​ठळक आरक्षणाची स्थिती:
​प्रभाग क्र. १, ४, ८, १० (जागा अ), १३, १६ (जागा अ) यांसह अनेक प्रभागांमध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी जागा निश्चित झाल्या आहेत.

​प्रभाग क्र. ३ (जागा ब), ५ (जागा अ), ६ (जागा अ), ७ (जागा अ), ११ (जागा अ) यांसारख्या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) सर्वसाधारण साठी आरक्षण मिळाले आहे.

​प्रभाग क्र. ३ (जागा अ), ८ (जागा ब), १२ (जागा अ), १४ (जागा अ), १५ (जागा अ) या प्रभागांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) स्त्री साठी जागा आरक्षित झाल्या आहेत.

​प्रभाग क्र. ९ मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी जागा (जागा अ) आरक्षित झाली आहे.

​या आरक्षण सोडतीमुळे आता विविध राजकीय पक्षांची तसेच स्थानिक कार्यकर्त्यांची आगामी निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती निश्चित होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 08-10-2025