चिपळूण : चिपळूण पालिका, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्यावतीने वाचू आनंदाने हा उपक्रम रविवारी (ता.५) शहरातील बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात उत्साहात झाला.
दर रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत वाचनासाठी वेळ देणारा हा उपक्रम चिपळूणमध्ये वाचनसंस्कृतीला नवे बळ देत आहे. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, भोसले, चितळे, कैसर देसाई, चव्हाण, प्रदीप पवार, प्राची जोशी, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर, सीए अमित ओक, सुनील खेडेकर आदी सहभागी झाले होते.
या वेळी राष्ट्रपाल सावंत म्हणाले, वाचू आनंदाने या उपक्रमातून नवीन पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होत आहे. डिजिटल युगात पुस्तकांपासून दुरावलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा ग्रंथालयांकडे वळवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:35 08-10-2025














