चिपळूणमधून राष्ट्रवादी काँग्रेसची शेखर निकम यांना उमेदवारी

रत्नागिरी : चिपळूण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार शेखर निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केली.

महायुतीत ज्या पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, त्या जागा त्याच पक्षाला सोडण्याचे सूत्र अनेक ठिकाणी असल्याने चिपळूण मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हे नक्की होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर करण्याआधीच मुंबईत झालेल्या बैठकीत काही उमेदवारांना एबी फॉर्म बहाल करण्यात आले. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार शेखर निकम यांची घोषणा करण्यात आली.

निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 23-10-2024