Guhagar: गुहागर नगरपंचायतीत नऊ जागांवर महिलाराज!

गुहागर : गुहागर नगरपंचायतीच्या १७ प्रभागासाठी बुधवारी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये नऊ जागांवर महिला आरक्षण पडले आहे. गुहागर नगरपंचायतीची प्रभाग सोडत शहरातील भंडारी भवन सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी व मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली.

आरक्षण सोडत मराठी शाळेतील विद्यार्थी पृथ्वी मुंजे, स्वराज गोगाणे व विनय जोशी यांचे हस्ते सोडत काढण्यात आली. यापूर्वी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला पडले आहे. यामुळे आता गुहागर नगरपंचायतीमध्ये दहा महिला असणार आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार ५९६१ मतदार संख्येनुसार नगरपंचायतीच्या प्रभागामधील गेल्या दोन टर्मची रोटेशन पद्धत झाली नाही. सरकारच्या नवीन अधिसूचनेनुसार या वर्षापासून थेट सोडतीद्वारे आरक्षण पद्धत अवलंबण्यात आली. यामुळे प्रथम १७ प्रभागांमध्ये सोडत पद्धतीने प्रवर्गासाठीचे आरक्षण काढले. पाचमधून तीन महिला आरक्षण करण्यात आले. त्यामध्ये प्रभाग क्रमांक ९, ४, १७ यामध्ये नामाप्र महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या १२ प्रभागांना सर्वसाधारण जाहीर करत यामधून ५० टक्के महिला आरक्षण प्रमाणे सहा सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक ३, ५, ६, ७, ८, १२ या प्रभागांवर सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे १७ पैकी नऊ जागांवर महिलाराज तर आठ जागांवर पुरुष उमेदवारासाठी लढत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 09-10-2025