आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५

मेष – आज चंद्र ०९ ऑक्टोबर, २०२५ गुरूवार च्या दिवशी मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल.

प्रत्येक काम यशस्वी होईल.

वृषभ – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. काही कारणास्तव खर्च वाढेल.

मिथुन- आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी – व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

कर्क – आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील.

सिंह – आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कन्या – आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज ‘मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. जलाशया पासून दूर राहा.

तूळ – आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपले मन मित्रांसह खाणे – पिणे, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील. एखादी सहल संभवते. मनोरंजनाची साधने व वस्त्रालंकार यांची खरेदी होईल.

वृश्चिक – आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. स्त्रीयांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल.

धनु – आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. पोटाच्या तक्रारीने हैराण व्हाल. वाद – विवाद किंवा चर्चा यामुळे समस्या निर्माण होईल.

मकर – आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान – प्रतिष्ठेची हानी होईल. पुरेशी विश्रांती व झोप न मिळाल्याने आरोग्य बिघडेल.

कुंभ – आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी व भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील.

मीन – आज खर्च, संताप व जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार व पैश्यांच्या देवाण – घेवाणीत सावध राहावे. कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 09-10-2025