रत्नागिरी : मरीनचे स्पेअर पार्टस पाठवण्यासाठी २६ हजार ३०० रुपये घेऊनही पार्टस न पाठवता फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थान येथील व्यापाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २८ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडली. राकेश जैन (रा. जयपूर, राजस्थान) असे संशयित व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात राजेंद्र शंकर पारकर (५१, रा. काळबादेवी पारकरवाडी, रत्नागिरी) यांनी सोमवार २१ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, राकेश जैन याची जयपूर राजस्थान येथे विनायक इंडस्ट्रीज नावाची मरिन स्पेअर पार्टसची कंपनी आहे. फिर्यादीने त्याच्याकडून मरीन स्पेअर पार्टसच्या दुकानात लागणारे सामान मागवून २८ ऑगस्ट रोजी १९ हजार ३०० आणि ३० ऑगस्ट रोजी ७ हजार असे एकूण २६ हजार ३०० रुपये फोन पे द्वारे पाठवले होते. पैसे पाठवूनही संशयिताने फिर्यादी राजेंद्र पारकर यांना कोणतेही सामान अद्याप पाठवले नसून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 23/Oct/2024














