राजापूर : आपल्या अतुलनीय कामगिरीच्या जोरावर आणि विविध वैशिष्टपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात माहीर असलेल्या आणि विविध स्तरावर मोठमोठे पुरस्कार प्राप्त जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आमदार किरण सामंत यांच्या सन्मानार्थ आमदार चषक भव्य जलतरण स्पर्धा नोव्हेंबर अखेरीला जैतापूरच्या खाड़ीमध्ये घेण्यात येणार आहे. असल्याची घोषणा मंडळाचे अध्यक्ष व जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर यांनी केली आहे.
यात अनेक नामवंत जलतरणपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी तुळसुंदे व साखरीनाटे येथील दर्यावर्दी बांधव तसेच कोकरी, जुवे, बुरम्बेवाड़ी, घोड़पोई येथील होड़ी मालक/चालक यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. अनेक वर्षानंतर ही स्पर्धा जैतापूरमध्ये होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे या स्पर्धेकड़े लक्ष लागून राहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 09/Oct/2025














