खेड : लोटेतील उद्योग भवन येथे औद्योगिक उपकरणांचे प्रदर्शन

लोटे : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील उद्योग भवन येथे इंडस्ट्रिअल मार्केटिंग असोसिएटस्च्या वतीने नुकतेच रासायनिक कारखान्यांमध्ये ऊर्जा आणि इंधन बचत करणाऱ्या उपकरणांचे प्रदर्शन आयोजित केले गेले. लोटेपरशुराम उद्योजक संघटनेच्या उद्योग भवन येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनामध्ये अल्फा लेव्हल, आयडेक्स, ग्रंडफॉस इत्यादी नामांकित कंपन्यांनी आपली उत्पादने मांडली होती. या प्रदर्शनामधून पर्यावरणाचे संवर्धन, वाया जाणारी ऊर्जा, उष्णता आणि इंधन वाचवून करणे शक्य आहे आणि जागतिक तापमान वाढ रोखणे कसे शक्य आहे, हे इंडस्ट्रिअल मार्केटिंग असोसिएटस्चे व्यवस्थापकीय संचालक एस. वाय. सावंत यांनी सांगितले. या प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा फेडरेशन ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, उद्योजक शिरीषकुमार चौधरी, किसन चव्हाण यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी प्रणव सावंत उपस्थित होते. या प्रदर्शनाचा लाभ शेकडो उद्योजकांनी घेतला. अशाच प्रकारचे प्रदर्शन महाड औद्योगिक वसाहतीत सुद्धा भरविण्यात आले. यातून शेकडो उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे याबाबत माहिती घेतली आणि भविष्यात इंधन आणि ऊर्जा कशी वाचवता येईल व वाया जाणारे इंधन आणि ऊर्जा पुनर्संकलित करून त्याचा पुनर्वापर केल्यामुळे जागतिक तापमान वाढ कशी रोखता येईल याविषयी जाणून घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 23/Oct/2024