देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या साईराज उमेश आंब्रे (१२वी बैंकिंग) व सुहेल शब्बीर हरचीलकर (१२वी कला) यांची शालेय विभागीय हॉलीबॉल स्पर्धेच्या (१९ वर्षाखाली गटात) चाचणीसाठी निवड झाली आहे. या विभागीय स्पर्धा मा. अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले होते. या स्पर्धेतील क्रीडा नैपुण्याच्या आधारावर उमेश आणि सुहेल यांच्या निवडीचे पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झाले आहे. जिल्ह्याचे उपविजेतेपद प्राप्त करणाऱ्या संघाच्या यशाचे, तसेच उमेश व सुहेल यांच्या विभागीय स्पर्धेतील निवडीसाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना प्रमुख प्रा. धनंजय दळवी, प्रा. प्रवीण जोशी, क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर उपस्थित होते.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या हॉलीबॉल संघात साईराज आंब्रे व सोहेल हरचिलकर यांच्यासह पियुष गोताड, ऋषिकेश बागम, वेद लिंगायत, पियुष वेले, आर्यन पेंढारी, दुर्वेश चिमाणे, सिद्धेश लिंगायत, नयन लिंगायत, सार्थक आडसे, सौरभ झेपले या विद्यार्थी खेळाडूंचा समावेश आहे. हॉलीबॉल संघाला क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर, क्रीडा शिक्षक तानाजी कदम व सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 09/Oct/2025














