चिपळूण : इनरव्हील क्लब लोटे आणि योगिता दंत महाविद्यालयाच्या मदतीने धामणदेवी बेलवाडी प्राथमिक शाळेत मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. योगिता दंत महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी, कोणते पदार्थ खावेत, खाऊ नयेत याचे मार्गदर्शन केले. शिबिरात विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना दातांच्या समस्या आहेत त्यांना पुढील उपचारांसाठी महाविद्यालयात उपचार केले जाणार आहेत.
या वेळी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत टूथब्रश आणि टूथपेस्टचे वाटप करण्यात आले तसेच शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले. कार्यक्रमाला इनरव्हील क्लब अध्यक्षा प्रणाली रेडीज, सचिव मयूरी काते, आयएसओ समिधा कोकाटे, एडिटर सोनाली रहाटे, ट्रेझरर पूनम कोळवणकर, सदस्या प्रणाली सुतार, श्रावणी सुर्वे उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 11/Oct/2025














